वीजबिल संदर्भात बैठक संपली, राज्यातील ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

1

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना वाढीव वीज बिलांमुळे झटका बसला आहे. घरगुती वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा अधिक आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात राज्यभरात संताप आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. लवकरच वीजबिल दरवाढ सवलतीचा प्रस्ताव आणला जाणार आहे. या नवीन प्रस्तावामध्ये  साधारणपणे 20 ते 30 टक्के वीजबिलात सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा समजला जाता आहे. याबद्दलचा प्रस्ताव एमईआरसीकडे राज्य सरकार देणार आहे. एमईआरसी या बाबत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून याची घोषणा होईल.

जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यातील सर्व ग्राहकांना वाढीव वीज बिलात 20 ते 30 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील  93 टक्के वीज ग्राहकांना याचा फायदा होईल, अशी माहिती ऊर्जा खात्यातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहे. वीजबिल सवलत देताना जानेवारी ते मार्च कालावधीत वीजबिल याचा सरासरी किती आले याचा विचार केला जाणार आहे.

एकूण वीजबिल ग्राहकापैंकी 73 टक्के ग्राहक घरगुती वापर करतात.  वीजबिल संदर्भात सूट देण्याबाबत आज चर्चा केली आहे. एमईआरसीला वीज बिलात सूट द्यावी अशी विनंती केली आहे, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

1 Comment
  1. सचिन दत्तात्रय महाजन says

    ते जाऊद्या वापर ग्राहकाने केला आहे ते ग्राहकच बिल भरेल पण दुसरा विषय असा आहे की
    महावितरण मध्ये 5 ते 10 वर्षां पासून महावितरण कंपनीत जे आऊट सोर्सिंग कंत्राटी कामगार काम करत आहेत त्यांचा विचार महावितरण केला नाही त्यांना वगळून महावितरण मध्ये विद्युतसहाय्यक पदाची भरती काढली त्यात त्यांचा विचार केला नाही आणि ग्राहकाचा काय विचार करणार आहे कंपनी बरोबर आहे ना मंडळी

Leave A Reply

Your email address will not be published.