वरणगाव बस स्थानक चौकात वाहतुक कोंडीची समस्या सुटेना

0

वरणगाव | प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहराच्या बस स्थानक चौकातून सकाळी सात वाजे पासुन शालेय विद्यार्थी , नौकरदार , व शेतकरी वर्गाची वर्दळ सोबत वाहनाची ये जा होत असल्याने चौकात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असुन वाहतुक नियत्रक असुन नसल्या सारखे झाल्याने हि समस्या सुटेनाशी झाली आहे
भुसावळ तालुक्यातील मुबंई नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरणगाव शहाराचा मुखवठा असलेला बस स्थानक चौकात सकाळ पासुनच नागरिकासह शाळा , कॉलेजात व रेल्वे स्थानकावर जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते सोबत राष्ट्रीय महामार्गा असल्याने वाहनाची रेलचेल मोठया प्रमाणात असते तर बारा वाजेच्या सुमारास शाळा , महाविद्यालय सुटल्या नतंर बस स्थानक चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी , बाहेर गावावरून येणारे प्रवाशी यांची यावेळी मोठी गर्दी होऊन रस्ता ओलडताना खुप त्रास करावा लागत असल्याने वरणगाव पोलीसाकडे अनेक दिवसा पासुन या चौकात किमान दोन वाहतुक नियत्रक बस स्थानक चौकात नेमणुक करण्याची मागणी करुणही या कडे दूर्लक्ष केले जात असल्यान वाहतुक कोंडीची समस्या सुटेनाशी झाली असल्याने नागरिकात तीव्र नाराजी आहे.
किमान दोन वाहतुक नियत्रंक अवश्यक
शाळा भरते वेळी व सुटते वेळी बस स्थानक चौकात विद्यार्थ्याची मोठी गर्दी या वेळेस होत असल्याने बऱ्याच वेळा रिक्षा चालकास वाहतुक नियत्रक करून विद्यार्थ्याना रस्त्या ओलाडण्यासाठी मदत करीत असतात अगदी चौकाच्या जवळस असलेल्या पोलीस स्टेशनला या कडे का लक्ष देत नाही हा एक प्रश्न नागरिक उपस्थीत करीत असुन या वेळत दोन वाहतुक नियंत्रक नियुक्त केले तर हि समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.