वरणगाव नगरपरिषद आरक्षण सोडतीत प्रस्तापीत नगरसेवकामध्ये ‘कभी खुशी कभी गम’

0

वरणगाव (वार्ताहर) : नगर परिषदेच्या सन २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकी साठी प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी अकरा वाजेला अठरा प्रभागा साठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात नगराध्यक्षा सह प्रस्तापीत नगरसेवकामध्ये कभी खुशी कभी गम चे वातावरण झाल्यान नगरसेवकाना सुरक्षीत प्रभागाची शोधा शोध करावी लागणार आहे.

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी सन २०२० साठी भुसावळ विभागाचे प्रांतधिकारी रामसिंग सुलाने यांच्या प्रमुख उपस्थीत सकाळी अकरा वाजेला बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृतात अठरा प्रभागा साठी नगरसेवकासाठी आरक्षण सोडत कु आर्या निलेश झाबंरे या चिमुकलीच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. यात प्रभाग क्र १ मध्ये सर्व साधारण महिल / पुरुषा साठी प्रभाग क्र २ ना म प्र खुला वर्ग महिला / पुरुष (OBC) साठी प्रभाग क्र ३ सर्व साधारण महिला राखीव, प्रभाग ४ सर्व साधारण महिला राखीव, प्रभाग क्र ५ सर्व साधारण महिला राखीव , प्रभाग ६ सर्व साधारण महिला राखीव , प्रभाग क्र ७ ना म प्र खुला वर्ग  (महिला / पुरुष OBC ) प्रभाग क्र ८ सर्व साधारण महिला / पुरुष , प्रभाग क्र ९ ना म प्र खुला वर्ग (महिला / पुरुष OBC) प्रभागा क्र १० सर्व साधारण महिला राखीव, प्रभागा  क्र ११ सर्व साधारण महिला / पुरुष प्रभाग क्र १२ सर्व साधारण महिला राखीव, प्रभाग क्र १३ ना म प्र खुला वर्ग ( महिला ) OBC , प्रभाग क्र १४ सर्व साधारण महिला / पुरुष, प्रभाग क्र १५ सर्व साधारण महिला / पुरुष , प्रभाग क्र १६ ना म प्र खुला वर्ग (महिला) OBC प्रभाग क्र १७ अनुसुचित जाती (SC) पुरुष / महिला, प्रभाग क्र १८ अनुसुचीत जाती (SC) महिला राखीव या प्रमाणे अठरा प्रभागा साठी सोडत काढण्यात आली आहे.

यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी कामकाज पाहिले तर मुख्याधिकारी श्याम  गोसावी, गणेश चाटे, अभय गुटाळ, दौलत गुट्टे, सजयं माळी आझाद पटेल गंभिर कोळी, गणेश कोळी, अनिल तायडे ,सतोषं वानखेडे , राजु गायकवाड व कार्यालयीन प्रमुख सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.

अध्यक्षसह नगरसेवक सुरक्षीत (नवीन) प्रभागाच्या शोधत
आरक्षण सोडतीने अध्यक्ष सुनिल काळे यांच्या पुर्वीचा प्रभाग क्र १० हा पुरुषासाठी होता. त्या प्रभागात महिला राखीव झाला आहे उपा नगराध्यक्ष शे अखलाक शे युसुफ, नगर सेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, नितिन निवृती माळी, रविद्र शांताराम सोनवणे, यांच्या प्रभागात महिला राखीव असल्याने त्यांना नव्याने आपल्या साठी सुरक्षीत असा प्रभाग शोधावा लागणार आहे नाही तर अपर्याहीने आपल्या घरातील महीलाची उमेदवारी द्यावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.