वरणगावला वैकल्पिक उपचार शिबिराचे उद्घाटन

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरणगाव येथे श्री संत सावता मंदिरात मंगळवारी डॉ.राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था, हनुमान गड, राजस्थान यांच्या वतीने वैकल्पिक असाध्य सर्व उपचार रोग शिबिराचे उद्घाटन सहकारमित्र चंद्रकांत बढे सर यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिराला प्रमुख माळी समाजाध्यक्ष संजय माळी, माळी समाज पंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष माळी, रामदास माळी, कृष्णा माळी, नामदेव मोरे पहेलवान, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष विजय माळी, विकास माळीयांची उपस्थिती होती.

श्री संत सावता मंदिरात 19 ते 23 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात मान दुखणे, मणक्याचे आजार, गुडघे दुखणे, मधुमेह या सारख्या असाध्य सर्व आजारावर अ‍ॅक्यूप्रेशरने उपचार केले जाणार आहे. या शिबिरात डॉ.एस.एस.लोहिया, डॉ.छत्रपती दंड ले, राज लोहिया, विकास गोस्वामी यांच्या टीमद्वारे उपचार केले जाणार आहे. शहरातील नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.एस.एस.लोहिया आणि माळी समाजातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.