वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

0

अहमदपूर (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी अहमदपूर कार्यकारणीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन अहमदपूर तहसील कार्यालय मार्फत देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रासह देशभरामध्ये मागच्या एक-दीड वर्षापासून कोरोना महामारी चे संकट सुरू असल्याने शेतकरी,शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी, विद्यार्थी या सर्व वर्गांचे  बेहाल होत आहेत. त्यामुळे अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सहदेव होनाळे  यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना ज्वलंत प्रश्नावर आधारीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये मागील वर्षाच्या मंजूर पीक विम्याचे वाटप तात्काळ करण्यात यावे ,अकोला पॅटर्नच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे देण्यात यावे, लाॅकडाऊन  काळातील शेतमजूर, बांधकाम कामगार व इतर मजुरांना निर्वाह भत्ता देण्यात यावा, डिझेल ,पेट्रोल व खाद्य तेलाच्या वाढत्या किंमती त्वरित कमी करण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लसीकरण करून शाळा पूर्ववत सुरू कराव्यात, दहावी व बारावीच्या परीक्षांचा पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुरू असलेला संभ्रम शासनाने लवकर निकाली काढावा, पदोन्नतीतील आरक्षणाचा कायम शासन आदेश काढावा, कोरोना काळामध्ये आई-वडील मृत्युमुखी पडल्याने अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेंटिलेटर व ऑक्सिजनसह सुसज्ज ठेवावेत, तसेच लॉकडाउन काळातील सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे अशा मागण्यासह मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सहदेव होनाळे लातूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील दहीकांबळे महासचिव प्रल्हाद ढवळे ,सारीपुत्र ढवळे व पदाधिकारी बाबासाहेब वाघमारे, विनय कुमारढवळे ,संतोष गायकवाड ,मौलाना बिलाल शेख, सय्यद तबरेज, संजय वाहुळे, तुकाराम कांबळे ,आदित्य वाहुळे, सचिन शृंगारे आदी पदाधिकाऱ्यांसह निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आघाडी सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा एडवोकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील शेतकरी ,शेतमजूर, कामगार ,व्यापारी ,विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन करेल असा इशारा  निवेदना मार्फत देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.