भुसावळ (प्रतिनिधी)- प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणखी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेः
1)लोकमान्य टिळक टर्मिनस प्रतापगड विशेष गाडी
*गाडी क्रमांक 01073 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड विशेष गाडी दिनांक 31.01.2021 पासून पुढील आदेशापर्यंत मंगळवार,रविवार ला लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 16.25 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी प्रतापगड 19.35 वाजता पोहोचेल.
*डाऊन दिशामध्ये थांबा- नाशिक-19.30/19.35, भुसावळ-23.20/23.25,भोपाल,झांसी,ओराई,कानपुर,लखनऊ,रायबरेली,अमेठी.
*गाडी क्रमांक 01074 अप प्रतापगड लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 02.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत गुरुवार,मंगळवार प्रतापगड हुन 01.50 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस ला 05.30 वाजता पोहोचेल.
*अप दिशांमध्ये थांबा- भुसावळ-22.40/22.45, नाशिक-02.05
आरक्षण: पूर्णतः आरक्षित सुपरफास्ट विशेषच्या अतिरिक्त गाड्यासाठी बुकिंग दिनांक 24.1.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
*उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
*केवळ आरक्षित तिकिट असलेल्या या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.