लासुर येथे शिक्षकांची कोरोना चाचणी

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-महाराष्ट्र शासनाचा “पुनश्च हरिओम” या संकल्पनेचे पुढील पाऊल म्हणून राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला असून ७ ते ८ महिन्याचा विलंबित कालावधीनंतर आता शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शिक्षकांचा कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून लासुर परिसरातील शिक्षकांचा चाचण्या संपन्न झाल्या.लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील लासुर,चुंचाळे, मामलदे,सत्रासेन,उमर्टी इत्यादी शिक्षकांचा चाचण्या संपन्न झाल्या. एकूण १०७ अहवालात २७ RTPCR यांचा समावेश असून सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची दिलासादायक माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश निळे यांनी दिली.याप्रसंगी समन्वयक अधिकारी डॉ.अमित देसले,डॉ.मोनिका हांडे,आरोग्य सेवक नितीन चव्हाण,आरोग्य सेविका एस.ए. खर्चाने,आरोग्य सहाय्यक एस.टी.पाटील,धनराज पाटील,फार्मसी अधिकारी किरण तायडे,शिपाई रवींद्र राठोड,कर्मचारी सुरेखा बोरसे,प्रवीण मगरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.