लाचखोर जिल्हा लेखा परीक्षकास ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

0

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ऑडिटची छाननी करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेताना जिल्हा विशेष लेखा परीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (४३, रा. जळगाव) यांना काल बुधवारी रात्री नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक होती. दरम्यान, आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. पी.वाय.लाडेकर यांनी संशयित आरोपी जंगले याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि इतर सहकारी यांनी यांच्या विविध पथसंस्थेच्या ऑडीटसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी रावसाहेब जंगले यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. दरम्यान, ऑडीटच्या छाणणीसाठी तक्रारदारांकडून ५२ हजार रूपयांची लाचेची मागणी ३१ जुलै रोजी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत रितसर तक्रार केली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचून लाचखोर जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी जंगले यांनी ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. पी.वाय.लाडेकर यांनी संशयित आरोपी जंगले याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकूर हे करीत आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.