लग्न समारंभाच्या अक्षदा पडण्यापूर्वी प्रशासनांची कारवाई ; २० हजार रुपयांचा दंड वसूल

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  शहरातील जामनेर रोडवरील वाल्मिक नगर भागात गुरुवार रोजी लग्न समारंभाचा सोहळा सुरू असतांना

अचानक पोलीस व नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या लग्न समारंभात शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने अक्षदा पडण्यापूर्वी प्रशासनांने दंडात्मक कारवाई केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरु असलेल्या लॉकडाउन मध्ये  कडक निर्बंध व संचारबंदी सुरु आहे . यात लग्न समारंभाना २५ जणांची प्रशासनाने परवानगी दिली आहे.

तरीही  जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेशांना झुगारल्याने  शहरातील वाल्मिक नगर भागातील रहिवाशी गोपाळ रामा ढोलपुरे  यांना २० हजार रूपयांचा फटका बसला.

गोपाळ ढोलपुरे यांच्या राहत्या घरी लग्न समारंभ सोहळा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून नगरपालिका पथक सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी करण्याकरिता गेले असता लग्न समारंभा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव (वर्हाडी ) उपस्थित असल्याने प्रशासनाने दिनांक २९/०४/२०२१ रोजी २० हजार रुपयांचा दंड  वसूल करण्यात आला.तर लग्नात

वरातीची परवानगी नसतांना मोहन चंदेले बग्गीवाले  आल्याने यांना देखील  प्रशासनाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या लग्न समारंभासाठी आलेला डीजे पथक मात्र  सर्व गडबड बघून  डीजे घेऊन परस्पर पोबारा  झाले .

आठवडे बाजारातही केली कारवाई

उपविभावीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत  दिनांक २९ रोजी  विना मास्क फिरणारे नागरिक तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारां विरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या २५ जणांकडून ५,७०० रुपये तर ७ दुकानदारांकडून १० हजार ५०० रुपये असे दिवस भरातून चार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ३७ हजार २०० रुपये आठवडे बाजार व लग्न समारंभाकडून वसूल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.