लग्न लावते वेळी ब्राह्मण गैरहजर, लग्न लावले वकिलाने

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  येथील एडवोकेट नितीन चौधरी हे विदर्भातील गोंदिया येथे मित्राच्या नातेवाईकाकडे लग्नाला गेले असता. लग्न घटिका जवळ आली तरीसुद्धा पुरोहित आले नव्हते, जवळपास अर्धा तास सर्वांनी पुरोहिताची वाट पाहिली. लग्नाचा मुहूर्त टळू  नये म्हणून  एडवोकेट नितीन चौधरी यांनी गुगल वर लग्नाचा मंत्र काढून मंत्र उपचाराने रीतसर वैदिक पद्धतीने लग्न लावले. तेव्हा वऱ्हाडी मंडळी ने सुटकेचा निश्वास सोडला.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील एरंडोल वकील संघटना  अध्यक्ष नितीन चौधरी हे गोंदिया येथे लग्नाला गेले होते. लग्नमंडपात वर वधू व सर्व वऱ्हाडी मंडळी हजर होते मात्र पुरोहिताचा पत्ता नव्हता. जवळपास अर्धा तास पुरोहिताची सर्वांनी प्रतीक्षा केली. परंतु पुरोहित येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. यावेळी समयसूचकता राखून एडवोकेट नितीन चौधरी यांनी माईक हातात घेतला. आणि पस्थित वर्‍हाडी मंडळी ला सांगितले की मी एरंडोल वकील बार असोसिएशनचा अध्यक्ष असून मी ब्राह्मण नाही मी तेली चौधरी समाजाचा आहे तुमची सर्वांची मान्यता असेल तर मी मंगलाष्टके म्हणून पुरोहिताची भूमिका बजावतो.

 

सर्वांनी मान्यता दिल्यानंतर एडवोकेट चौधरी यांनी गुगलवर लग्नाचा मंत्र काढून मंत्र उपचाराने रीतसर वैदिक पद्धतीने लग्न लावले. अशाप्रकारे सामाजिक रुढी परंपरेला फाटा देण्यात आला व सामाइक समरसता जोपासण्यात आली. या विवाहात एक नवा पायंडा पडला व समाजाला नवीन दिशा दाखवली गेली. दरम्यान वऱ्हाडी म्हणून  विदर्भात गेलेले खानदेशातील वकील  एडवोकेट नितीन चौधरी यांनी विदर्भातील  लग्न लावले या त्यांच्या समय सुचते बद्दल व पुढाकार आ बाबत सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.