रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटा भाड्यांमध्ये पाच पट वाढ

0

भुसावळ | प्रतिनिधी

कोरोनाचा प्रसार व होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांचे भाडे तात्पुरते वाढविण्याचा निर्णय घेतला  आहे.  यात भुसावळ विभागातील  स्थानकांवर केवळ  प्लॅटफॉर्म तिकिटांच्या भाड्यात तात्पुरती वाढ झाली असून ही वाढ १७ मार्च ते  15  एप्रिल 2020 पर्यंत होईल.  प्लॅटफॉर्म तिकिटचे भाडे जे 10 रुपये आहे ते आता 15.04.2020 पर्यंत पाच पट वाढवून  50 रुपये केले आहे.

भुसावळ विभागातील एकूण 9 स्थानके असून यामध्ये   नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा या स्थानकांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.