राहुल शेवाळेविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार – खा.सुप्रिया सुळे

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. मात्र हे माझ्याविरोधात षडयंत्र असून मी राहुल शेवाळेच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. निवडणुका तीन दिवसांवर आल्या असताना अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे, असे सुळे म्हणाल्या.

राहुल शेवाळे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेलेत ते काही एकटेच नाहीत असे स्पष्टीकरणही खा.सुळे यांनी दिले. एक महिला आहे म्हणून अशा पद्धतीने घाण राजकरण केले जात आहे. मी जर धमकी दिली असेल तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती असे सांगत शेवाळे पोलीस स्टेशनला का गेले नाहीत ? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

ऑडिओ क्लीप संभाषण

सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?

राहुल शेवाळे : हॅलो

सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो? राहुल शेवाळे : हां ताई.

राहुल शेवाळे : नाही.

सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे, की पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून…

राहुल शेवाळे : हां.. नाही नाही…

सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?

राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.

सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा…. हा हा, नाय तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोळसेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?

राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हनलं तुम्हाला मी

सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय. एक लक्षात ठेवा. राहुळ शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. मी गंभीर आहे. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्यासारखी खरी बाई नाहीय. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.

राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.

सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.

Leave A Reply

Your email address will not be published.