राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे थकीत अनुदान वितरित करण्यात मंजुरी

0

भडगाव (प्रतिनिधी): राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे सन 2019-20 मधील थकीत अनुदान ३२ कोटी 93 लाख 75 हजार रुपये इतका  निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली असून तसा संबंधित जी.आर ही  शासनाने  काढला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.उमेश पाटील यांनी दिली.

राज्यावर कोसळलेले महामारी कोरोनाचे संकट अशातच राज्यापुढे निर्माण झालेले अनेक प्रश्न अशा ही परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, राज्याचे  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन ग्रंथालयांच्या अनुदाना संदर्भात संबंधित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  श्री.उदय सामंत यांच्या सोबत  आयोजित केलेली व्हिडिओ द्वारे झूम मीटिंग. उपमुखमंत्री अजित  पवार  यांची प्रत्यक्ष मुंबई येथे भेट घेऊन ग्रंथालयांच्या थकित अनुदाना संदर्भात केलेली मागणी.अशा अथक परिश्रमाला यश मिळालेले असून.

नुकताच शासनाने राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहाय्यक अनुदानासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक डब्ल्यू-४,२२०५ कला व संस्कृती,१०५, सार्वजनिक ग्रंथालये(०३),(०१) मध्यवर्ती जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य ( अनिवार्य ) (२२०५ ०२९८ ) ,३१ सहाय्य अनुदाने ( वेतनेतर )या लेखाशीर्षंतर्गत रु-१२३ , ७५, ००, ००० एकशे  तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांचा  सन 2019-20 चा निधी लॅप्स झालेला होता .हा निधी मिळणे तर धुसरं च झाले होते , अशक्य होते.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या सात जिल्ह्याचा निधी अगोदर देऊन राज्यातील इतर जिल्ह्यातील राहिलेले थकित अनुदान लवकर देण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आलेली होती. या मागणीला शासनाने सात जिल्ह्यांचे अनुदान आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील थकीत अनुदान वितरीत करण्यास मंजुरी दिलेली आहे.

 

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या समन्वयक सौ रिताताई बाविस्कर, उपाध्यक्ष  प्रशांत लोंढे, उपाध्यक्ष  अक्रुर सोनटक्के, संतोष दगडगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. यामुळे राज्यातील शासनमान्य ग्रंथालयाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, समन्वयक सौ रीताताई बाविस्कर आणि सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले. असे  राष्ट्रवादी काॅग्रेस ग्रंथालय जळगाव जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.