रक्तदानाच्या चळवळीला तोेेंं देतोय् बळ!

0

25 वेळा केले प्लेटलेटचे दान : अयाज मोहसीनचा विक्रम

जळगाव, दि. 24 –
रक्तदान श्रेष्ठदान… जो आहे भाग्यवान तो करतो रक्तदान अशा नानाविध ब्रीद वाक्यांनी रक्तदानाची महती सर्वसामान्यांना पटवून देत असतानाच जळगाव शहरातील पत्रकार असलेले अयाज मोहसीन खान हे रक्तदान चळवळीला मोठे बळ देत आहे. सर्वसामान्यांसाठी किचकट असलेले प्लेटलेटचे त्यांनी आतापर्यंत तब्बल 25 वेळा दान केले असून अनेकांच्या आयुष्याला संजीवनी दिली आहे. अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असलेल्या प्लेटलेटबाबत ते अतिशय संवेदनशील असून ते गरजवंताला लागलीच त्यासाठी मदत करीत असतात.
अयाज मोहसीन खान यांच्या कुटुंबात अचानकच तिघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. हा चटक त्यांच्या मनाला खोलवर जखम करुन गेला. भाऊ स्व. सलीम खान याचे वयाच्या 25 व्या वर्षीच निधन झाल्याने त्याच्या आवडीच्या समाजसेवेचा वसा अयाज खान यांनी स्विकारला. होइल तेवढे… आहे तेवढी आणि शक्य ती मदत करण्यास ते कधीही पुढे असतात. समाजात रक्तदानाबद्दल अनेक समज-गैरसमज आहे, ते दूर करण्यासाठी अयाजभाई प्रयत्न करीत आहेत. रक्ताचा असलेला तुटवडा त्यातच रुग्णाला आवश्यक असलेली प्लेटलेट सहज उपलब्ध होणे शक्य नाही. मनुष्याच्या शरीरातून काढण्यात आलेल्या प्लेटलेटसच दुसर्‍याचे आयुष्ट सुंदर बनवू शकतात, त्यासाठी मनाची तयारी आवश्यक आहे. घरातील संस्कार आणि भावाची अपूर्ण राहिलेली समाजसेवा यासाठी अयाजभाई रक्तदान व प्लेटलेटदानाच्या माध्यमातून पूर्ण करीत आहेत. महर्षी दधीची यांनी पुरातन काळात आपल्या अस्तींचे दान करुन गरजवंताला त्याची उपलब्धी करुन दिली होती. त्याच धर्तीवर रक्तदान आणि प्लेटलेट दानाचे दान सर्वसामान्यांनी केले तर रुग्णाला नवसंजीवनी मिळू शकते. हल्ली सर्वाधिक युवक सोशल मिडीयाचा मोठा उपयोग करीत असून प्लेटलेट व रक्तदानासाठी त्याचा उपयोग केला तर गरजवंताला योग्य मदत मिळू शकते.
महिलाही करु शकतात दान
समाजात या प्रक्रियेबद्दल मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे. रक्तदान वा प्लेटलेट दान हे महिला देखील करु शकतात. नैसर्गिकरित्या महिलांच्या शरीरातील रक्ताचे भिसरण दरमहिन्याला होत असते. मात्र पुरुषांनी रक्तदान केले तरच त्यांच्या शरीरात पुन्हा रक्त तयार होते. रक्तदान वा प्लेटलेट दान हे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने करु शकतात. प्लेटलेट दानासाठी जाड लोकांची जास्त आवश्यकता असून त्याचा अभिमान असल्याचे मिश्किलपणे अयाजभाई म्हणाले.
राष्ट्रीय एकात्मता जोपासली
रक्तदान वा प्लेटलेटदानाने तन-मन-आत्मा शुद्ध होतो. आजपर्यंत पन्नासच्यावर रक्तदान, प्लेटलेट दान केले असून कधीही जाती-धर्माचा विचार केला नाही. हिंदू, मुस्लिम,शीख सारेच आपले बंधू आहे हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जोपासला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.