येस बॅंकेवरील निर्बंध उद्यापासून उठणार !

0

मुंबई : येस बॅंकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही या बॅंकेवरील निर्बंध बुधवारी सकाळी 6 वाजता दूर होणार आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. ग्राहकांनी गुरुवारपासून बँकेच्या नेहमीच्या कालावधीत व्यवहार करावेत. बँकेच्या डिजिटल बँकिंग सेवा व मंच यांचाही ग्राहकांना वापर करता येणार आहे. निफ्टी ठरवणाऱ्या ५० कंपन्यांमधून येस बँकेचे नाव १९ मार्चपासून वगळले जाणार आहे.

रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, बॅंकेच्या ग्राहकांनी किंवा ठेवीदारांना ठेवी काढून घेण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. बॅंकेचे नवे संचालक मंडळ लवकरच कार्यभार हाती घेणार आहे.

त्याचबरोबर या बॅंकेला भांडवलाची टंचाई भासणार नाही यासाठी रिझर्व्ह बॅंक लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.या बॅंकेचे भागभांडवल विकत घेण्यासाठी स्टेट बॅंकेसह बऱ्याच खासगी बॅंका पुढे आले आहेत त्यामुळे बॅंकेची भांडवली परिस्थिती समाधानकारक राहणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.