मोबाईल टॉवर उभारणीला स्थानिक रहिवाश्यांचा विरोध !

0

काम बंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

जामनेर(प्रतिनिधी) :-शहरातील गट न.२५०/ब/१/१प्लॉट क्र.७अ व ७ब मध्ये भ्रमणध्वनी टॉवर उभारणीचे काम सुरू असल्याचे व सदरील काम हे बेकायदेशीर व नियम बाह्य असल्याचे स्थानिक रहिवाश्यांचे व नगर परिषदेच्या नगर सेवकांचे म्हणणे आहे. संबंधीत कंपनीला मुख्याधिकारी यांनी नोटीस सुद्धा बजावली असून सुद्धा संबंधित कंपनीने सदर टॉवर चे काम जवळ,जवळ पूर्ण केले आहे.

नगर परिषद प्रशासनाला बेकायदेशीर कामाबाबद थेट कारवाई करण्याचे अधिकार असून नगरपरिषद या कामाबाबत काही एक कारवाही करण्यास तयार नाही व वेळो, वेळी नागरिकांना कारवाही करण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी सदर कंपनीवर कारवाही होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. तसेच सदर कामाबाबत बांधकाम विभागाची भूमिका सुद्धा संशयास्पद वाटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच सदर टॉवर च्या कामापासून १५फुटावर मशीद आहे.तर ३० फुटावर जिकरा इंग्लिश प्राथमिक शाळा आहे.सदर गटातील अनेक नागरिकांनी या कामाबाबत हरकत घेतलेली आहे. तरी मुख्याधिकार्यानी सदरचे टॉवर चे बांधकाम त्वरित थांबविण्याचे आदेश संबंधीत कंपनीला द्यावे हि मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.कारवाही न झाल्यास आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी खालील लोक उपस्थित होते. डॉ.प्रशांत भोंडे,उपनागराध्येक्ष,अनिस शेख, एल एस खान,नुरू शेख,खालील खान,नासीर खान,जाकीर खान,फारूक मण्यार,शेख रफिक,अलियार खान,शफी मिस्तरी, समीर खान,मुरसलिन,इम्रान खान आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.