मोदींचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा भाजपवर पलटवार

0

नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. या विधानावर भाजप खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर करत भाजपवर पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओमध्ये मोदींनी दिल्लीला, बलात्काराची राजधानी असे संबोधले होते. त्यामुळं राहुल गांधी यांनी मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

नरेंद्र मोदींचा २०१४चा एक व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये मोदी म्हणाले कि, दिल्लीला रेप कॅपिटल बनविण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण जगात भारताचे नाव बदनाम झाले आहे. महिलांच्या सुक्षेसाठी तुमच्याकडे कोणतीही योजना नाहीच पण ते थांबवण्याची तुमच्यात ताकदही नाही. आणि तुम्ही विरोधी पक्षावर खोटे आरोप करत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.