बोदवड पं.स.च्या सभापतीपदी किशोर गायकवाड यांची वर्णी

0

लोकशाहीचं भाकित ठरलं खरं

बोदवड : बोदवड पंचायत समिती सभापतीपदी किशोर भिमराव गायकवाड यांची वर्णी लागली आहे. किशोर गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागणार असल्याचे भाकित  दैनिक लोकशाहीचं खरं ठरलं आहे.

सभापती गणेश पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेकरिता आज दि.१३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडण्यात आले. दरम्यान, आरक्षण कोणत निघणार?आणि सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता बोदवडकरांना लागून होती. अखेर बोदवड पंचायत समिती सभापतीपदी किशोर गायकवाड यांची वर्णी लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.