मुक्ताईनगर येथे ‘ त्या ‘ घटनेचा निषेध !

0

मुक्ताईनगर : बुलढाणा जिल्ह्यातील लिहा (ता.मोताळा) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली . सदर घटनेचा निषेध म्हणून निवेदन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

सदरचे निवेदन मुक्ताईनगर तालुक्यातील  आंबेडकर अनुयायी बांधवांनी मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना दिले त्यानंतर मुक्ताईनगर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारतातील प्रत्येकाला सन्मानाने व अभिमानाने स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणे ही घटना अतिशय निंदनीय असून यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेमुळे राष्ट्रीय एकात्मतेस तडा देण्याचे षड्यंत्र  काही अपप्रवृत्ती करीत आहेत  यांचे षड्यंत्र वेळीच हाणून पाडले पाहिजे त्यासाठी यातील  जोशींचा शोध घेऊन  त्यांच्यावर  कठोर कारवाई  करण्यात यावी  अन्यथा सदरचे आंदोलन  लोकशाही पद्धतीने तीव्र करण्यात येईल असा इशाराही  निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे .

यावेळेस उपस्थित जनसमुदायाने ” बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो .” ,  ” या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी . ” अशा   घोषणांनी आकाश दुमदुमले. याप्रसंगी जि.प .सदस्य जयपाल बोदडे,,मिलिंद बोदडे,शरद बोदडे , रवींद्र बोदडे ,  चंद्रमणी इंगळे , हरीश बोदडे ,नाना बोदडे,पृथ्वीराज बोदडे,दीपक धुंदले,संध्या हिरोळे ,सुमित बोदडे, ,दीपक बोदडे, पुना बुवा इंगळे , संजीव पालवे , एडवोकेट राहुल पाटील,मोहन मेढे,अमर रोठे,निखिल मेढे,मुकेश बोदडे,अशोक बोदडे,विवेक बोदडे,करण गणेश,  महेंद्र मेढे , अजय तायड़े , जम्बो बोदडे, विनोद बोदडे ,शशिकांत पगारे , दीपक गाढ़े , कांतिलाल शिरसाठ यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.