मुक्ताईनगर तालुक्यातील महत्वाच्या 5 पुलांच्या मंजूर कामांना लवकरच सुरुवात होणार

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील नवे बोरखेडा भोटा सुळे चिंचखेडा धुळे जोंधनखेडा रस्ता प्रजिमा -92 वर किमी 12/100 , 12/00 ,17/00 , 17/500 , 18/00 मध्ये सुळे गावाजवळ 2 पुल व चिंचखेडा ते धुळे लालगोटा रस्त्यावर 3 पूल असे एकूण 5 पुलांच्या रु 5 कोटी अंदाजित रकमेच्या कामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी मिळाली होती महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यासन अधिकारी यांचे कडील दि.16 फेब्रुवारी 2021 चे पत्रान्वये त्यांनी कळविले होते व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशीत केलेले होते. त्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याने या कामांवर निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे पत्र संबंधित कार्यालयास प्राप्त झाले असल्याने आता लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे अशी माहिती  आमदार चंद्रकांत पाटील यांचे  स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील नवे बोरखेडा भोटा सुळे चिंचखेडा धुळे जोंधनखेडा रस्ता प्रजिमा -92 वर किमी 12/100 , 12/00 ,17/00 , 17/500 , 18/00 या रस्त्यावर  सुळे गावाजवळ 2 पुल व चिंचखेडा ते धुळे लालगोटा रस्त्यावर 3 पूल अशा एकूण 5 पुलांची निर्मिती करण्यात यावी अशी  नागरिकांची मागणी होती.

यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून सदरील कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा तसेच निधीची तरतूद तात्काळ व्हावी यासाठी   सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.त्यानुसार संबंधित  सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची तरतूद  बाबत पत्र प्राप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.