मार्केट बंदमुळे शेतकरी वर्ग गावातच विकतोय माल

0

निपाणे,  ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात आला असला तरी मार्केट बंद मुळे खुप काही कष्ट शेतकरी वर्गाला सहन करावे लागत आहे. शेती मालाला मार्केट मध्ये देवून ही पैशांसाठी मात्र पंधरा तिनं आठवडे चकरा माराव्या लागत आहे त त्यामुळे शेतकरी वर्ग वैतागला असून त्याने आपला शेत माल गावातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बाजरी १५०० शे रुपये क्विंटल ज्वारी १६०० शे ते १७०० शे रुपये क्विंटल गहू १७०० शे ते १८०० शे रुपये क्विंटल भुईमूग शेंग ५००० रुपये क्विंटल या भावाने गावात च खाणार्यांना देत आहेत आणि घेणारे देखील मार्केट च्या भावाने पैसे शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे मध्यम शेतकरी वर्गाला आता मार्केट बंद ची काही चिंता नसली तरी मोठा बागायतदाराला मार्केट शिवाय पर्याय नाही सध्या कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लॉक डाऊन आणखी पुढे वाढविण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे काही ठिकाणी मार्केट ही बंद ठेवण्यात आले आहेत. त्याचा परिणाम शेतकरी वर्गाचा शेत मालावर जाणवू लागला आहे. शेती व्यवसाय परवडत नसला तरी एक पूर्व जात खानदानी व्यवसाय म्हणून शेतकरी शेती कसतो त्यातही कधी काळी आसमानी तर कधी काळी सुलतानी संकट येवून शेतकऱ्यांचे पार कंबर मोडून टाकते त्यामुळे बळीराजा आर्थिक खाईत लोटला जावून कर्ज बाजारी होतो. डोईजड झालेले कर्ज फिटत नसल्याने एक दिवस हाताश होवून आत्महत्या हाच पर्याय निवडतो. आज कांदा पिकाची काय अवस्था आहे २०० रुपये गोणी बळजबरीने द्यावी लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटर मारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण नाका पेक्षा होती जड म्हणजेच उत्पादन पेक्षा खर्च अधिक अशी वेळ बळीराजा वर येवून ठेपली आहे.

शासन माय बाप तुम्हीच त्याचा कैवारी बना शेती मालाला हमीभाव द्या शेतकरी हिताचे चांगले निर्णय घ्या तरच काळ्या आईत राब राब राबणारा बळीराजा चे शेतीशी असणारे नाते टिकून राहिल. अन्यथा कृषी प्रधान म्हणणार्या भारत देशात शेतकरी हा कृषीवैभव म्हणून जगणारा जगाचा पोशिंदा संपायला वेळ लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.