माणसापासून माणसापर्यंत कार्यक्रमात भिल्ल वस्तीत कपडे वाटप

0

वरणगांव  :- माणसापासून माणसापर्यंत कार्यक्रमात भिल्ल वस्तीत कपडे वाटप केवलाई फाउंडेशन पाचोरा तर्फे माणसांपासून माणसांपर्यंत या उपक्रमाअंतर्गत  २जून रोजी हतनुर जवळ लुमखेडा शिवारात भिल वस्तीत  ताप्ती नगर मध्ये कपडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबा पाटिल व उपाध्यक्ष अशोक पाटील, पत्रकार मनोहर लोणे , संस्थेचे पदाधिकारी राहुल पाटील, सागर पाटील , रवी पाटील, किशोर पाटील,सोहम पाटील उपस्थित होते.

गरजु लोकापर्यत , साडया , ड्रेस , लहान मुलांचे कपडे आदी उपक्रम संस्था नेहमी राबवत असते , अन्न , वस्त्र , यापासुन . वंचित असलेल्या या वस्तीत हा उपक्रम घेण्यात .आला , येथे ४०० . लोकवस्ती असुन प्रत्येक घरापर्यत कपडे पोहचले. यावेळी अशोक पाटिल यांनी आदर्श पालकत्व व बचत यावर मार्गदर्शन केले शेवटी योगेश भिल यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.