महापरिर्वाण दिना निमित्त अभिवादन कॅन्डल रॅलीचे आयोजन

0

भुसावळ :  दि. 6डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौध्द जनसेवा संघ ,नाहाटा कॉलेज परिसर, भुसावळ  यांचे वतीने अभिवादन कॅन्डल रॅली काढण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता नाहाटा काॅलेज चौफुली पंढरीनाथ नगर येथील  गुरू चंन्दमणी बुध्दविहारापासून रॅलीला सुरूवात करण्यात आली . अष्टभुजा मंदीर, पांडूरंग टाॅकीज,बाजारपेठ पोलीस स्टेशन, बसस्टॅन्ड मार्गे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळया जवळ  सामुदायिक अभिवादनाने समारोप करण्यात आला .

यावेळी  भुसावळ शहरातील व  परिसरातील बौध्द बांधव सहकुटूंब रॅलीत सहभागी झाले होते .यशस्वितेकरिता   बौध्द जनसेवा संघ अनुयायी यांनी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.