मलकापूरातील कोविड केअरमध्ये पेशंटना एकच पोळी अन् सकाळचीच भाजी सायंकाळी

0

ॲड रावळांच्या मानवता धर्माला सलाम: एक पोळी मानवतेची….भुकेलेल्या मुखाची

 मलकापूर: येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल  रुग्णांची जेवणा-खाण्याची अतिशय भयावह स्थिती असुन या सेंटरमधील रुग्णांच्या भोजनाचे कंत्राट बुलडाणा येथील व्यक्तीने घेतलेले आहे.रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या पेशंटना चहा-नाश्ता तर नाहीच पण धड दोन वेळचे जेवणही पुरेसे व दर्जेदार दिले जात नाही.

 

संबंधीत कंत्राटदाराकडुन केवळ एक पोळी पानगोबीची भाजी अन् मुठभर थोडासा भात असा आहार रुग्ग्णांना दिला जातो.सामान्य रुग्णांचे पोट भरावा असाही हा आहार नसल्याने रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरु असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष अ‍ॅड.हरिश रावळ यांनी थेट कोविड केअर सेंटर गाठुन उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन रुग्ण आहाराबाबत वस्तुस्थिती जाणुन घेतली.त्यावेळी रुग्णांच्या तक्रारीत तथ्थ्य दिसून आल्याने त्यांनी भोजनपुरवठा कंत्राटदारासोबत दुरध्वनीवरुन चर्चा केली.

 

मात्र आम्हाला याच प्रमाणात आहार वितरणाचे निर्देश असल्याचे कंत्राटदाराने सांगीतल्याने अखेरीस रुग्णांची हाल दूर करण्यासाठी अ‍ॅड.रावळ यांनी स्वत:च पुढाकार घेण्याचे निश्चित केले.त्यानुसार स्थानिक रामदेव कॅटर्स सोबत संपर्क करुन नगराध्यक्ष अ‍ॅड.हरिश रावळ यांनी स्वखर्चातुन आजपासून रुग्णालयात दाखल रुग्णांना दोन्ही वेळच्या गरमागरम जेवण वितरणास सुरुवात केली.भरपेट आहाराची व्यवस्था झाल्याने रुग्णही समाधानी दिसून आले.याबाबत बोलतांना अ‍ॅड.रावळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण हे गोरगरीब असून त्यांना अपुरे व सकाळचे शिळे अन्न सायंकाळी खावे लागत असल्याची स्थिती न पाहवल्यानेच आपण मानवता धर्मातून हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.