मराठी भाषा आपली अस्मितेची भाषा ; डॉ. सी. एस. करंके

0

चोपडा : पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे  मराठी विभाग द्वारा१४जाने.२०२१ ते२८,जाने२०२१ या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”साजरा करण्यात येत आहे. त्या  निमित्ताने दिनांक १४जाने.२०२१ रोजी डॉ. सी. एस .करंके यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक  होते . या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. आपल्या व्याख्यानात प्रा. डॉ.सी. एस. करंके यांनी  मराठी भाषेचा आणि साहित्याचा सविस्तर आढावा घेतला. मराठी भाषा आपल्या अस्मितेची भाषा आहे हे सुद्धा सांगितले .म्हणून सर्व ठिकाणी मराठीचा वापर केला पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर पाठक यांनी मराठी साहित्यावर सविस्तर रीत्या प्रकाशझोत टाकला.

मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हे सुध्दा सांगितले.  या ऑनलाईन व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुण डी.मोरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.