पारोळा | प्रतिनिधी
करंजी ता,पारेळा येथील मजुराने आपल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यातील श्रावण धनराज भिल याने खबर दिली की, पिरन धनराज भिल( वय ३०)रा, करंजी ता, पारोळा यांची पत्नी माहेरी गेली असता त्याने ता,-१५ रोजी सकाळी साडे दहा वाजेचे सुमारास करंजी गावी आपल्या स्वतःच्या घरी लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील पो,हे काॅ, इकबाल शेख करीत आहे. दरम्यान मजुराने कोणत्या कारणाने गळफास घेतले ते समजुन आले नाही