भुसावळ तालुका पोलिसांचे वॉश आऊट सुरुच ; ८३,७०० किमतीची अवैध गावठी दारू व रसायन नष्ट

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ तालुका पोलिसांची वॉश आऊट मोहिम सुरुं असून या अंतंर्गत तालुक्यातील वराडसीमसह फेकरी शिवारात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर २१ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळच्या सुमारास धडक कारवाई करीत सुमारे ८३,७०० रूपयांची अवैध हातभट्टीदारू मुद्देमालासह जप्त करून कच्चे रसायन नष्ट केले आहे. छाप्यात एकुण ५१२ ड्रमात २२०० लीटर रसायन व एकूण ८३,७०० किमतीची गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली आहे.

याकारवाईत वराडशिम शिवारात जंगल भागात पांझर तलावा जवळ सार्वजनिक जागी ४.३०  वाजेचे सुमारास संशयीत आरोपी भरतसिंग उर्फ पिंटू देवीदास ठाकुर रा.वराडशिम हा गुळ ,महू, नवसागर ,मिश्रीत रसायनाची गावठी हातभट्टीची दारू जळत्या चूलीवर गाळतांना ५ ड्रम मध्ये ९०० लिटर, कच्चे रसायणासह  आणि गावठी हात भट्टीची ३० लिटर तयार दारू असे अंदाजे  किंमत ३२ हजार २०० रुपयाच्या  मालासह मिळुन आला.

तर दुसऱ्या धाडीत वराडशिम शिवारात सार्वजनिक जागीजंगल भागात पांझर तलावाजवळ ४.४५ वाजेचे  सुमारास  सूनिल बाबुराव कोळी रा. वराडशिम हा गुळ, महू, नवसागर  ,मिश्रीत रसायनाची गावठी हात भट्टीची दारु जळत्या चूलीवर गाळतांना ७ ड्रम मध्ये १३०० लिटर, कच्चे रसायणासह  आणि गा हात भट्टीची ५० लिटर तयार दारू असे अंदाजे  किंमत ४७ हजार रुपयाचे मालासह मिळुन आला.

तर तीसऱ्या  कारवाईत

फेकरी  शिवारात झेडटीसी भागातव १ वाजेचे सुमारास संशयित आरोपी आकाश रमेश परदेशी रा. कवाडे नगर हा  गावठी हात भट्टीची ५० लिह दारू ४५. कि. ची कब्ज्यात बाळगतांना मिळुन आला. छाप्यात  एकुण ५१२ ड्रमात २२०० लीटर रसायन व एकूण ८३,७०० किमतीची गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली  आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केली म्हणून भादवि कलम २७० , १८८ अन्वये असे गुन्हे दाखल करण्यात आ़ले आहे.

सदरची विभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  रामकृष्ण कुंभार , सपोनी अमोल पवार,  सफौ सुनिल चौधरी, पोहेकॉ युनूस शेख, पो हे कॉ विठ्ठल फुसे, पोना राजेंद्र पवार,प्रदीप इंगळे राहुल महाजन होमगार्ड रितेश शेकोकारे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.