भुसावळात ७ रोजी रिक्षा चालकांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रीक्षा चालकांना किरकोळ कारणांवरून आरटीओ विभागाकडून मेमो दिले जात असल्याने रीक्षा चालक जेरीस आले असून या अन्यायाविरोधात रीक्षा चालक-मालक नेते जगन सोनवणे यांच्या उपस्थितीत जून्या पालिका इमारतीमध्ये बैठक होऊन रीक्षा चालकांनी साप्ताहिक आंदोलनाची घोषणा केली आहे.

7 ते 24 डिसेंबर दरम्यान विविध आंदोलनाचे नियेाजन या बैठकीत करण्यात आले. शनिवार, 7 रोजी सकाळी दहा वाजता जुन्या नगरपालिकेतून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, 10 डिसेंबर रोजी भुसावळ ते जळगाव आरटीओ विभाग कार्यालयावर रिक्षा चेतावनी मोर्चा सकाळी दहा वाजता निघेल. 13 डिसेंबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता बेमुदत उपोषण, 16 डिसेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर दादर गोरखपूर एक्सप्रेससमोर रेल रोको आंदोलन, 19 डिसेंबर रोजी दुपारी देान वाजता गांधी पुतळा भुसावळ येथे जेलभरो आंदोलन, 21 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर रीक्षा हॉर्न बजाओ आंदोलन तर 24 डिसेंबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता रीक्षा चालक-मालक परीवाराचे अत्याचार बंद करो सामूहिक मुंडण आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनांचे नियोजन गुरुवार रोजी करून आरटीओ विभागाच्या कारभाराविरुध्द रीक्षा चालक मालक संघटनेने निदर्शने केली

Leave A Reply

Your email address will not be published.