भुसावळात शिक्षकाकाकडून पुन्हा विद्यार्थ्यास मारहाण !

0

शिक्षकांविरूध्द अदखलपात्रेचा गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) – 5 सप्टेबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नुकताच शिक्षकांनी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेतले मात्र अवघ्या पंधरवाङयातच येथील दोघां शिक्षकां कडून शैक्षणिक क्षेत्रात काळीमा लागल्याच्या घटना घडल्या.

दोन दिवसांपूर्वी सेंट्रल रेल्वे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक मिश्रा यांनी एका विद्यार्थीनीला प्रश्न विचारण्याचा राग आल्याने  मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शहरातील महाराणा प्रताप हायस्कूलमधील शिक्षक घोडके यांनी नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यास केवळ शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थी उभा न राहिल्याने मारहाण केल्याची दूसरी घटना लागोपाठ घडली. विद्यार्थ्यांने घडला प्रकार त्याचे घरी आईवडिलाना सांगितला यावरून आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.