भुसावळात महिलेसह तिघांना मारहाण ; नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील खडका रोड मन्यार हॉल शेजारील महिलेसह तिघांना मारहाण करणाऱ्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगरसेवकासह चौघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक खडका रोड भागातील रहिवाशी अर्फुन्नीसा बी शेख अफजल(वय ४९) यांचा चुलतभाऊ शेख फईम व शेजारी राहत असलेल्या शेख नाजिस शेख नासिर या दोघांमध्ये वाद झाले होते.

यावेळी दानिश हा आला व शेख फईमला अवांच्च शिविगाळ करू लागला व लाकडी दांड्याने फईमवर हल्ला करून गंभीर जखमी केले.या बाबत मध्यस्थी करण्यासाठी अर्फुन्नीसा बी आल्या असता शेख नासिर सरदार व नगरसेवक हाजी शेख जाकीर सरदार हे तेथे आले व नासिरने लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,सपोनि अनिल मोरे यांनी भेट दिली.माजी नगरसेवक हाजी आशिक खान यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात शेख नाजिस शेख नासिर,शेख दानिश उर्फ बबन,शेख नासिर सरदार व नगरसेवक हाजी शेख जाकीर शेख सरदार या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.हे.कॉ.जयेंद्र पगारे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.