भुसावळात दारूची चोरटी वाहतूक : दोघे आरोपी जाळ्यात

0

बाजारपेठ पोलिसांची कारवाई : 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) :  दारूची बेकायदा वाहतूक करताना दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील विठ्ठल मंदिराच्या बाजूला रस्त्यावर प्रदीप प्रकाश सदावर्ते (३२) अनिल सुरेश सदावर्ते (२२, रा.व्दारका नगर, भुसावळ हे दोघे आरोपीं (एम.एच.१९ बी.डी.९३५८)या  दुचाकी वरून येत असतांना गुन्हे शोध पथकाने त्यांना हटकले असता आरोपींच्या ताब्यातून ३ हजार ६०० रुपये किंमतीच्या कॅनन बियर कंपनीच्या २४ बाटल्या, एक हजार ९८० रुपये किंमतीच्या ट्युबर्ग बियर कंपनीच्या १२ बाटल्या तसेच दोन हजार ४९६ रुपये किंमतीच्या देशी टँगो पंच कंपनीच्या या ४८ बाटल्या तसेच २० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून २८ हजार ७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, गुन्हे शोध पथकातील रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, दिनेश कापडणे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.