भुसावळात कोरोना तपासणी शिबिरात 55 जणांचे घेतले स्वॅब

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरतर्फे रविवारी शहरातील हुडको कॉलनी परीसरात कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी 55 जणांचे स्वॅब घेण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने ही मोहिम राबवली जात आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी, डॉ. कुणाल फेगडे, नगरसेवक राज खरात, अधिपरीचारीका अश्विनी बागूल, धनसिंग राजपूत, विशाल केदारे, इलियाज खान आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.