भुसावळात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासकीय नियमानुसार भगवान परशुराम जन्मोत्सव साज़रा

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भगवान श्री परशुराम जन्मोत्सव  समाजभिमुख कार्य करून आनंदाने व साध्या पद्धतीने  परशुराम भक्त व समस्त ब्राह्मण समाजातर्फे  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासकीय नियमानुसार आज शुक्रवार रोजी  साज़रा करण्यात आला .

जन्मोत्सवानिमित्त  तापी नदीच्या किनारी असलेल्यां श्रीभगवान परशुराम मंदिरात समिति व ब्राह्मण समाजातर्फे श्री भगवान परशुराम पूजन, आरती, माल्यापर्ण करण्यात आले . यानिमित्त मंदिरात त्या नंतर श्री भगवान परशुराम मंदिरात  येणाऱ्या भाविकभक्तां साठी पिण्याचे पाणी याकरीता   ब्राह्मण समाज समिती तर्फे थंड पाण्याची फिल्टर मशीन  लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

मशीन लावण्याचे कार्य लवकरच करणार आहे तसेच यानिमित्त तापी रोड़वरील दगड फोड़णाऱ्या  मेहनती,  कष्टकरी,  मंजूराना तसेच गोरर-ग़रीब गरजू लोकांना एक वेळचे जेवण पार्सल स्वरुपात  देण्यात आले . कोरोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांचे व परिवाराचे कोरोना पासून संरक्षण व्हावे  बचाव व्हावा  म्हणून सेनिटाइजर, मास्क व  कोरोना वायरस लक्षात घेऊन त्यांना वाफ  घेण्याची मशीन  वाटप करण्यात आली.

या प्रसंगी समिति अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा), कैलाश उपाध्याय, भूषण वैद्य, विनोद शर्मा, गोपाळ जोशी , प्रशांत वैष्णव, देवेश कुलकर्णी, पाथरकर गुरुजी, अनिरूद्ध कुलकर्णी,अभिलाष नागला, वेद औजा, अभिजीत मेने,श्रीकांत जोशी, गौरव हिंगवे, गौरव शर्मा, आदित्य शर्मा, शंतनु गजके आदि समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी समाजाच्या वतीने कोरोना माहमारीच्या या  विषाणुचा अंत करून   पूर्ण जगाला वाचव मानवाचे रक्षण कर अशी सर्वानी सामुहीक प्रार्थना केली

Leave A Reply

Your email address will not be published.