भुसावळात एकनाथराव खडसे यांचा सपत्नीक सन्मान

0

भुसावळ (प्रतिनिधी)- माजीमंत्री एकनाथराव खडसे त्यांचा सपत्नीक सन्मान आयोजित करण्यात आला होता. आपले परिवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सर्वजनिक कीर्तन महोत्सव २०२० हा ५ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. रविवार रोजी आषाढी व कार्तीकी एकादशीला नियमित पांडुरंगाच्या दर्शनास जाणारे वारकरी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचा आयोजकांतर्फे सपत्नीक सन्मान करण्यात आला तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍यांचा गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजीमंत्री एकनाथराव खडसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय सावकारे , मंदाताई खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, रजनी सावकारे, पं.स.सभापती मनिषा पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे,ऍड. बोधराज चौधरी पिंटू कोठारी, प्रा.डॉ.सुनिल नेवे, अजय नागराणी भा.ज.पा.शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, जळगाव येथील उद्योजक किशोर ढाके, धनंजय कोल्हे, नरेंद्र नारखेडे उपस्थित होते.

या प्रसंगी एकनाथराव खडसे यांचा सपत्नीक स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देवून आयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच आ. संजय सावकारे यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. तसेच महेश फालक यांना समाज भुषण पुरस्कार, प्रा.डॉ. सुनिल नेवे यांना व्यवस्थापन गौरव पुरस्कार, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी सावकारे यांना उत्कृष्ट संघटक गौरव पुरस्कार,किशोर ढाके व मंगला भिमराव पाटील यांना उद्योजक गौरव पुरस्कार, नगरसेवक प्रमोद नेमाडे व निर्मल कोठारी यांना बेस्ट कॉन्सीलर पुरस्कार व धनंजय कोल्हे यांना लेखन गौरव पुरसकर देवून सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आ. सावकारे म्हणाले की, या वाचनालयातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून समाजातील चांगली माणसे शोधणे हे कौशल्य असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी नाविण्य आणि सातत्यामुळे संस्कृतिकक्षेत्रात हे वाचनालय पथदर्शी ठरले आहे असे प्रतिपादन केले.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मनोगत व्यक्त करतांना वारकरी संप्रदाय मोठा आहे.काळानुरुप बदल यात घडले. समाजाची गरज ओळखून नाविन्याचा ध्यास घेवून विविध उपक्रमांचे आयोजन वाचनालय करत आहे. वारकरी परंपार मोठी आहे. ह.भ.प.धनजी महाराजांचा वारसा या किर्तन महोत्सवाच्या निमित्ताने प्रज्वलित झाला आहे. नविन वारकरी तयार झाले पाहिजे असे सांगितले. यावेळी वाचनालय एक प्रेरणास्त्रोत हे धनंजय कोल्हे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास टाळकरी, माळकरी, किर्तनकार , वारकरी बहुसंख्येने उपस्थित होेते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ह.भ.प.दिपक महाराज यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर चौधरी ,गोविंद वराडे ,अजय वाघोदे ,सतीश ढाके ,श्रीकांत पाटील नेमिचंद धांडे,प्रदीप मनसुटे , उदय बोंडे,राहुल भारंबे , पराग पाटील,हर्षा पाटील , साई कॉलनी, लक्ष्मी नगर व वांजोळारोड परिसरातील नागरीकांनी सहकार्य केले .

Leave A Reply

Your email address will not be published.