भुसावळ | प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर भागातील तीन वर्षीय चिमुकलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. हरी काशीनाथ अहिरे (50, दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी अहिरे हा सेंट्रीग कामे करीत असल्याची माहिती असून त्यास चार मुली असून त्यातील दोघे विवाहित आहेत. तीन वर्षीय चिमुकलीला फुस लावून आरोपीला जवळ बोलावत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post