भुसावळातील प्रभाग ९ मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

0

भुसावळ : येथील प्रभाग ९ मधील विकास कामांचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते २७ सोमवार रोजी सायंकाळी करण्यात आले. चक्रधर नगर रोटरी हॉल येथे युवकांसाठी पालिकेच्या माध्यमातून जिम व व्यायामशाळेसह विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास  आमदार संजय सावकारे ,नगराध्यक्ष , रमण भोळे, मुख्याधिकारी सौ. करूणा डहाळे,जिल्हा सरचिटणीस भाजपा सुनिल नेवे , अॅड बोधराज चौधरी, सोनी बारसे, संतोष बारसे, बेस्ट काॅनसिलर पुरस्कार मिळवणारे नगरसेवक प्रमोद नेमाडे, देवा वाणी, मामा पाचपांडे, ए.जी.पाटील, सतीश सपकाळे, अजय नागरानी, आरोग्य सभापती युवराज लोणारी, शिक्षण सभापती मुकेश पाटील, भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, देवा वाणी, निक्की बत्रा, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व्हे नं. २२/२ब मधील जागेत उभारण्यात आलेली अद्यावत जिम व व्यायमशाळा तसेच सर्वे नं. २२६/१+२ मधील नागरीकांच्या सुविधांसाठी पेव्हर ब्लॉक व बेंचेस बसविलेल्या कामांचे व  मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेल्या कामाचे उदघाटन करण्यात आले .या कामाकरीता नगरसेवक अॅड  बोधराज चौधरी यांनी स्वत: ४० हजार रुपये खर्च करून बोरींग केल्या तसेच पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून रेन हार्वेस्टिंग बसवले. यांचेही उद्घाटन आमदार संजय सावकारे यांनी  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शांताराम पाटिल गुरुजी यांनी केले प्रास्तवीक अॅड  बोधराज चौधरी यांनी केले .यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.