भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या चीनचा भुसावळात शिवसेनेतर्फे निषेध

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- भारतीय सैन्यावर हल्ला करणाऱ्या चीनचा भुसावळात शिवसेनेतर्फे गुरुवार १८ जुन रोजी निषेध करण्यात आला असून केंद्र सरकारला पाठींबा व्यक्त करीत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सामाजिक व राजकीय संघटना आणि व्यक्तींच्या निषेधाचे व्हिडिओ यानिमित्ताने व्हायरल होत आहेत. अशावेळी चिनच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळात शिवसेनेच्यावतीने कार्यकर्त्यांनीही चीनच्या निषेधात उतरून केंद्र सरकारला पाठींबा व्यक्त करीत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय सीमेत घुसखोरी करून चीनने पाठीत खंजीर खुपसला आहे. आताही सैन्य मागे घेत दबावाचे धोरण अवलंबिले असून, त्यांना जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे असे निवेदनात म्हटले आहे.

भारतीय सैन्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करीत यावेळी वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, चायना   मुर्दाबाद.. चायना.. हाय.. हाय.. अशा निषेधार्थ घोषणा यानिमित्ताने शिवसैनिकांनी दिल्या आहे.

यांची होती उपस्थिति
यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना तालुका प्रमुख हेमंत बऱ्हाटे, युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.