भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

0

जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र सकाळी ११ वाजताच स्पष्ट होऊ लागल्याने भाजप-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करायला सुरुवात केली.

भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये निवडणूक मतमोजणीची आकडेवारी आणि सर्व ठिकाणाची परिस्थिती बघण्यासाठी कार्यकर्त्याची टीव्हीसमोर गर्दी होती. तर अनेक जण मोबाईलवर देखील अपडेट बघत होते. हर हर मोदी आणि घर घर मोदीच्या घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. जळगाव कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवारांच्या विजयाचे पोस्टर सकाळी ११ वाजेपासूनचं लागायला सुरुवात केली. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये भाजपच्या तुलनेत खूपच निरुत्साह जाणवला. बाजारपेठ, कार्यालये आणि इतर ठिकाणी निकालाचीच चर्चा रंगत आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी तर सकाळपासूनच फटके, गुलालाची खरेदी केली आहे. अनेक ठिकाणी दुपारीच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष करायला सुरुवात केली. अनेकांनी पेढे वाटून विजयोत्सवास सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.