भाजपाचे माजी मंत्री किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली :- बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र व भाजपाचे माजी मंत्री किर्ती आझाद यांनी आज (दि.१८) पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षविरोधी कारयावा केल्याने आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती.


काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांचा मुकाबला पारंपारिक लढत असणाऱ्या भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत होणार आहे.

आझाद यांनी २०१४ मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा पराभव केला होता. त्यावेळी जदयूचे उमेदवार संजय कुमार झा हे तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, यावेळी झा जदयूच्या तिकीटावरुन एनडीएचे उमेदवार म्हणून इथून उभे राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.