भागवत भंगाळे संशयाच्या फेऱ्यात : पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील सात दिग्गजांना घेतले ताब्यात

0

जळगाव – जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी सिल्व्हर पॅलेस  चे मुख्य संचालक भागवत भंगाळे यांचा बी एच आर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याच्या संशयावरून आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

बीएचआर पतसंस्थेच्या गाजत असलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दुसरा दणका दिला असून आज पहाटेच जळगाव जिल्ह्यातून सात दिग्गजाना अटक केली आहे.

यात राजकीय पदाधिकाऱयांसह दिग्गजांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे चाळीस हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचे पथक आज गुरुवारी पहाटेच जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे.

यात पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे, पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली, जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा या सात जणांना अटक केली आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

दरम्यान जिल्हापेठ पोलीस स्थानकात जळगाव शहर आमदार राजूमामा भोळे हे दाखल झाले असून पुण्याहून आलेल्या पथकाशी ते संवाद साधत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.