भडगाव तालुक्यात आ. किशोर पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

0

भडगाव :- तालुक्यात काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने केळीबागांसह, मोसंबी, पपई पिकांचे व घरांसह इतर नुकसान झाले. तालुक्याचे आ किशोर पाटील  यांनी दि.१३ रोजी नुकसानीची पाहणी केली. तालुक्यातील निंभोरा येथे विश्वासराव पाटील,समाधान  पाटील यांचे केळी पिक नुकसानीची  पाहणी केली. यावेळी माजी सरपंच माधवराव पाटील, हिरामण पाटील, गोरख पाटील, उदय पाटील, यासह शेतकरी उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा विजवितरणचे अभियंता सपकाळ यांना वादळाने वाकलेले विज पोल, तारा तात्काळ दुरुस्त करण्याची सुचना केल्या. तसेच सर्व शेतकर्यांचे पंचनामे करण्यात येतील व या अधिवेशनात हा प्रश्न मांङु. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ठोस पावले उचलु असे आमदार किशोर पाटील यांनी शेतकर्यांशी बोलतांना सांगीतले. नंतर कोठली येथेअविनाश पाटील यांची केळी पिकाची पाहणी केली. केळी व्यापारी माल मनभाव मागतात.५०० रुपये क्किंटल भावाने मागणी करतात असे कांतीलाल पाटील यांनी मांङले.तसेच देव्हारी कनाशी येथे सरपंच संजय पाटील, समाधान भोपे,हर्षल पाटील,  अरुण पाटील, डॉ.अमृत पाटील आदिची भेट घेउन  राजकीय चर्चा रंगली. नंतर बोदर्ङे येथे दिलीप पाटील, वसंत पाटील यांचेसह केळी पिक नुकसानीची पाहणी केली. आमदारांनी अधिकार्यांना  सुचना केल्या. यावेळी सरपंच योगेश पाटील,भालचंद्र पाटील, वाल्मीक पाटील, सोमनाथ पाटील, गुलाब पाटील आदि शेतकरी हजर होते.

नंतर बोरनार शिवारात  सुरेश नारायण महाजन महाजन यांचे केळी बागेचे नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच पी ङी माळी, नारायण माळी, प्रभाकर पाटील आदि शेतकरी उपस्थित होते.  नंतर सायंकाळी बात्सर येथे योगेश पाटील, राजेंद्र कोळी या शेतकर्यांचे केळी पिक नुकसानीची पाहणी आमदार किशोर पाटील यांनी केली. यावेळी दिपक शिंदे, उत्तमराव पाटील, धर्मराज पाटील आदि शेतकरी  उपस्थित होते. पिचर्ङे येथ परशुराम पाटील यांच्या केळी पिक नुकसानीची आमदारांनी पाहणी केली. दिपक महाजन, विठ्ठल पाटील,  साहेबराव पाटील, धनराज पाटील हजर होते. पांढरद येथेआमदारांनी केळी पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी मच्छींद्र पाटील, राजेंद्र पाटील, आदि शेतकरी हजर होते. वङजी येथे कांतीलाल परदेशी यांचे केळी पिक नुकसानीचीही पाहणी आमदार किशोर पाटील यांनी केली. यावेळी सोबत भङगावचे पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरङे, सहकार क्षेञ प्रमुख युवराज पाटील, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉ.. विलास पाटील, माजी जि. प. सदस्य विकास पाटील, जालींदर चित्ते वाङे, स्वीय सहाय्यक राजु पाटील आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.