भडगाव तालुक्याचा पारा ४६ अंशांच्या वर

0

भडगाव :- सध्या शहरासह तालुक्यात प्रचंङ तापमान वाढल्याने नागरीक अक्षरशा हैराण झाले आहेत. परिणामी तालुक्याचे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे चिञ नजरेस पङत आहे.

तापमानाने नागरीक घामोघाम
सध्या उन्हाची तिव्रता मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्याचा पारा सध्या ४६ सेल्सीयस तापमान जाणवत आहे. वाढत्या तापमानाने तालुका प्रचंङ तापत नागरीक घामोघाम होतांना दिसत आहेत. दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. शेतकरी व मजुरही शेतातील कामे सकाळुन करतांना दिसत आहेत. एप्रील मसीन्यातच मे हीटचा तङाखा जाणवत आहे. उन्हापासुन बचावासाठी नागरीक व सावलीचा आधार घेतांना दिसत आहेत. दुपारच्या रणरणत्या उन्हापासुन बचावासाठी जनावरे झाड्यांच्या सावलीचा आधार घेत विश्रांती घेतांना दिसत आहेत. नागरीक पायी वा वाहनांवर फिरतांना रुमाल, टोपी बांधुन बचावासाठी वापर करतांना दिसत आहेत.

शितपेय दुकानांना अच्छे दिन
सध्या तापमानाने घामोघाम झालेले नागरीक, महीला शरीराला गारवा मिळावा म्हणुन शितपेयांकङे वळले आहेत. लस्सी, आईसक्रीम ,आननस, आंबे यासह विविध फळांचे गार ज्युसचा व ऊसाच्या रसचा लाभ घेतांना दिसत आहेत. सध्या शितपेय दुकानांवर नागरीकांसह महीलांची मोठया संख्येने गर्दी नजरेस पङत आहे. त्यामुळे सध्या शितपेयांच्या दुकानांची चलती असुन अच्छे दिन दिसत आहेत.

भङगाव रुग्णालयात उष्माघत कक्ष स्थापन
उन्हाच्या दाहकतेने ञस्त नागरीकांना शरीराची काळजी घेणे, आरोग्य विभागाकङे तात्काळ दाखल होणे. तसेच भङगाव ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ञास झाल्यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच नागरीकांनी भर उन्हात फिरणे टाळावे.प्रवास टाळावा.जलसंजीवनीचा वापर करावा. शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. जास्तीत जास्त पाणी प्यावे.तसेच उन्हाचा ञास झाल्यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. असे आवाहन भङगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी ङाॅ. पंकज जाधव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.