बोदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ४२ वर

0

बोदवड – कोरोना विषाणूने शहर तथा तालुक्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला असून दिवसेंदिवस शहर तथा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतचं आहे.शहरातील नगर पंचायत परिसरातील शिवाजीनगरातील एका ६० वर्षीय तर तालुक्यातील जामठी गावातील आठवडे बाजार पट्टा परिसरातील ३४ वर्षीय,३७ वर्षीय व ५५ वर्षीय पुरुष अशा तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे.
बोदवड नगरपंचायत प्रशासन व जामठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबधित रुग्ण राहत असलेले परिसर सिल करण्यात आला असून चारही बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.