बोदवडवासियांनो घराबाहेर पडू नका; नगरपंचायत मुख्याधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

0

बोदवड (प्रतिनिधी): जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.लॉकडाऊन आणि संचारबंदीसाख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.आपणही संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून बोदवड शहर तीन दिवस (१०० % लॉकडाऊन) १ मे ते ३ मे पर्यंत करण्यात येणार आहे, दवाखाने,मेडिकल दुकाने सुरु राहतील व दुध डेअरी सकाळी ७ ते ९ व सायं ५ ते ७ यावेळेत सुरु राहतील ‘घाबरु नका पण काळजी घ्या,प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नागरिकांची एकजुट महत्वाची असुन येणाऱ्या काळात घेतलेली योग्य खबरदारी आपल्याला संकटावर मात करण्यास मदत करणार आहे.त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ओळखुन वागणे गरजेचे आहे.तरीही आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशा इशारा मुख्यधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रातून दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.