बहीण नांदवत नसल्याच्या रागात शालकाने केला मेव्हन्याचा खुन ; संशयीत आरोपी पोलीसात हजर

0

जामनेर (प्रतिनिधी):-आपल्या बहीणीला नांदवत नसल्याचा प्रचंड राग मनावर असलेल्या शालकानेच नामी शक्कल लढवुन मेव्हण्याचा खुन करून कायमचा संपवीला.घटनेतील संशयीत आरोपीताने स्वतःहुन पोलीस ठाण्यात बुधवार रात्री साडेसातच्या दरम्यान हजेरी लाऊन मि माझ्या मेव्हण्याचा खुन केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे हजर झाल्यावेळी त्याच्या हातामधे रक्ताने माखलेला भला-मोठा चाकु सुध्दा असल्याचे सुत्रांनी सांगीतले.जामनेर-बोदवड रस्त्यावरील लहासर फाट्यानजीक (घटनास्थळ) पोलीस आरोपीबरोबर गेले मात्र पाऊस आणी तो मद्यधुंद असल्याने ठिकाण निटपणे दाखवीत नव्हता,त्यामुळे गुरूवार सकाळी पुन्हा पोलीसपथक घटनास्थळी तपासासाठी गेले.
भागवत मोतीराम पारधी (मेव्हणा) वय ३० राहणार चिंचखेडा बुद्रुक ता जामनेर असे मयत मेव्हण्याचे नाव आहे. तर संशयीत आरोपीचे (शालक)परमेश्वर प्रकाश पारधी वय २५ राहणार नेरी तालुका जामनेर असे आहे.

याबाबत सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की सुमारे तीन वर्षांपुर्वी (२०१७) आरोपी परमेश्वच्या बहीणीचे (सुरेखाबाई) हिचे लग्न झाले होते,अपवाद वगळता आप-आपसातील घरगुती वादविवादामुळे बहुतांश वेळा सुरेखाबाई हि माहेरी (नेरी) येथेच रहात होती. यावरूनच बऱ्याचदा भावाला मेव्हण्याचा राग यायचा,त्यामुळे त्यांच्यात खटकेही उडायचे. गेल्याच आठवड्यात दोघांमधे वादही झाला होता.अखेर या वादाचे पर्यावसान बहीणीच्या कुंकु पुसण्यात झाले. बुधवार उशीरा सायंकाळी दोघांनीही जेवण घेतले. दरम्यान दोघांनी मनसोक्तपणे दारू प्यायल्याचेही सांगण्यात आले.त्यातुनच मेव्हण्याचा कायमस्वरूपी काटा काढण्याचा राक्षसी विचार त्याने (परमेश्वरने) प्रत्यक्षात आणला.पोलीस ठाण्यात स्वतःहुन हजेरी लावलेल्या संशयीत आरोपीला आज (२९) सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे व पथकाने त्या ठिकाणी नेऊन पहाणी केली.

यावेळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनीही भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणुन घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.