बहादरपूर येथे विषारी औषध सेवन केल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

0

पारोळा – तालुक्यातील बहादरपुर येथे एका २० वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले असल्याची घटना घडली याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

तालुक्यातील बहादरपुर येथे २० रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर कैलास भिल  वय २२ हा घरी सांगून गेला की मी बाहेरून फिरून येतो नंतर काही वेळानंतर तो गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शौचालयाजवळ बेशुद्ध अवस्थेत काहीतरी विषारी औषध सेवन करून पडलेला आढळून आला.  त्यास लगेच त्याचे नातेवाईक व गावातील मंडळीनी कुटीर रुग्णालय पारोळा येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याबाबत आज पोलिसात कैलास उत्‍तम भिल यांनी खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पो हे कॉ अशोक कुणबी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.