बजरंग सेनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी वेदांत मुंदाने यांची निवड

0

अमरावती (प्रतिनिधी) :  अमरावती गाडगे नगर येथील युवा विश्व वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्ध तबलावादक तथा सामाजिक कार्यकर्ते वेदांत मुंदाने यांची बजरंग सेना भारतच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. बजरंग सेना भारतचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.दिनेश भाऊ जाधव यांनी त्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी बजरंग सेनेच्या वतीने अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार असल्याचे व बजरंग सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.दिनेश भाऊ जाधव यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन  माझी जिल्हाध्यक्षपदी निवड करून जो विश्वास दाखविला आणि जबाबदारी दिली त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.

बजरंग सेनेचे कार्य निष्ठेने तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असून लवकरच जिल्हा कार्यकारिणीची निवड करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निवडीबद्दल , प्रतीक गारपवार, कृष्णा पोहणे,पवन सोनारे, कार्तिक मुगुल,जय  कीरकटे,निखिल पुनसे,अक्षय गाढवे,भाविक विंचुरकर, अभिजीत ढंगारे अभिलाश भाऊ टेकाळे, तेजस भाऊ विंचुरकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.