फैजपूर येथे टिपू सुलतान जयंती साजरी

0

फैजपुर ;- हजरत टिपू सुलतान हे देशभक्त व हिंदू मुस्लिम एक्यवादी होते . त्यांनी देशासाठी रक्त सांडविले. देशभक्ताची कुठलीच जात व धर्म नसतो.त्यांच्यासाठी देशच मोठा असतो. त्यांनी कधिच मंदिरे लुटली नाहीत.उलट मंदिराना दान दिले. त्यांना व्हीलन ठरविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.ते खरे देशभक्त डायमंड हिरो आहेत. आम्हाला आमचा चष्मा बदलण्याची व दुषित दृष्टीकोण बदलण्याची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन पीआरपीचे नेते जगन सोनवणे यांनी २० रोजी संधयाकाळी फैजपूर येथे नेताजी सुभाष चौक येथे पार पडलेल्या आभिवादन सभेत केले.
यावेळी बोलताना भारतीय टिपू सुलतान सेना राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे म्हणाले की,खानदेश मधे टिपू सुलतान जयंती ची मी 5 गेले वर्षा पासुन साजरी करण्याचे दिप लावले आहे.आता हे दिप राज्यात व देशात ही टिपू सैनाकाची देशभक्त चळवळ उभी राहिल असे सांगितले .
यावेळी आयोजक जिल्हा प्रमुख अल्पसंख्याक आघाडी प्रमुख व भारतीय टिपू सेना नेते आरिफ़ शेख श्री . छत्रपती सेना जिल्हा प्रमुख ओबीक सेल ,पीआरपी जिल्हा प्रमुख गोपी साळी ,नगरसेवक जलिल शेख ,नगरसेवक प्रभाकर सपकाले , युवा प्रमुख अन्वर खाटिक,प्रा.अशोक भालेराव आदी उपस्थित होते . सुत्र संचालन अन्वर खाटिक ने तर आभार प्रा.अशोक भालेराव यांनी मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.