फैजपूरला सार्वजनिक भिमजयंती उत्सव समिती गठित

0

फैजपूर प्रतिनिधी  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगामी १३० व्या जयंतीनिमित्त नुकतीच फैजपूर येथे जयंतीउत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यानिमित्त सम्राट बौद्ध विहारात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमर मेढे, उपाध्यक्षपदी मुन्ना मेढे, सचिवपदी भूषण मेढे, तर खजिनदारपदी योगेश मेढे, सल्लागार मयूर मेढे यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी विलास सपकाळे, पप्पू मेढे, लखन मेढे, अजय मेढे, अभिजित मेढे, हर्षल मेढे, सागर भालेराव, चेतन मेढे, सुमित मेढे, राजू वाघ आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व समाज बांधवांनी मास्कचा वापरून व सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करून भिमजयंती महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.