फर्दापूर येथे अपघातग्रस्तांच्या मदतीला ना. गिरीशभाऊ आले धावून

0

गजानन तायडे
जामनेर ;– राज्यभरात ज्यांची आरोग्यदूत म्हणून ख्याती असलेले राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन हे रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून जात असतात . त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला .  एका अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्याचे आदेश देऊन मगच पुढे ना. महाजन रवाना झाले .


याबाबत माहिती अशी कि, औरंगाबादहून जळगावकडे जात असलेला विकास दूध संघाचा आयशर (क्रं.एम.एच.04 सि.जि4703) व   जळगावकडून औरंगाबादकडे येत असलेल्या आयशर (क्रं.एम.एच.06 जी.4692) यांची फर्दापूर येथील राजकूंवर महाविद्यालयाजवळ समोरा समोर धडक होवून भीषण अपघात झाला . या अपघातात विकास दुध संघाच्या आयशरच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला . तर जळगावहून औरंगाबादकडे जात असलेला आयशर महामार्गावर पलटी झाला.या अपघातात दोन्ही आयशर मधील निलेश आत्माराम पल्लाड (रा.सिल्लोड) पवनकुमार शर्मा (रा.अयोध्यानगर औरंगाबाद) व अन्य एक असे तिघे जण जखमी झाले .

यापैकी निलेश पल्लाड याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली . दरम्यान याचवेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जामनेर(जि.जळगाव) हून खामगावकडे जात असतांना हा अपघात त्यांच्या निर्दशनात आला . त्यांनी तात्काळस्वतःच्या वाहनातून तिन्ही जखमीनां जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रवाना केले व घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल होईपर्यंत स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.या नेहमीच्या मदत कार्यामुळे ना.गिरीष महाजन हे सर्व सामान्यांचे कैवारी असल्याचे दिसून आले .

Leave A Reply

Your email address will not be published.